| |
 |
 |
 |
 |
| |
|
 |
|
नमस्कार,
मला लहानपणी वाचनाची खूप आवड होती. शालेय शिक्षण मराठी माध्यमातून आणि त्यात आईच मराठीची शिक्षिका त्यामुळे घरी मराठी पुस्तकांचा राबता असणं साहजिकच होतं. प्राथमिक शालेय जीवनातील चांदोबा, किशोर, चिंगी, गोट्या, फास्टर फेणे पासून वाचनाचा चढता आलेख बटाट्याची चाळ, स्वामी, श्रीमान योगी, पानिपत पर्यंत पोहोचला. आणि मग महाविद्यालयीन जीवनाचं पर्व सुरू झालं. शिक्षणाचं माध्यम इंग्रजी झालं.
AiQak vaacaa...
|
 |
| |
|
|
|
 |
| |
 |
 |
| चारोळ्या |
|
नवनिर्मितीचा तिढा |
|
शिवबा |
श्रीखंड किंवा बासुंदीतील कंटाळवाणं सातत्य खंडित करण्याकरता त्यात खमंग अशा चारोळ्या घालतात ... रोजच्या सपक बातम्यांमधील खुसखुशीतपणा दाखवणाऱ्या ह्या काही शाब्दिक चारोळ्या!
नेते आणतील लोकपाल
लावून बसलात डोळे
लांडगे राखतील शेळ्या
असे कसे तुम्ही भोळे?
(मे १०, २०१२)
रचलंय मोठं स्वयंवर
स्थळं आली किती
प्रेमविवाहे मिळेल का
राष्ट्राला ह्या पती
(मे ४, २०१२)
तोफांमधून दुर्गंधी
भिजत ठेवलंय घोंगडं
सूर्य उगवेल का हो
झाकून ठेवलंय कोंबडं
(एप्रिल २५, २०१२)
उपेक्षितांना आरक्षण
शाळांमधून सगळ्या
ऐकून एका शाळेत
शिरला एक बिबळ्या
(एप्रिल २२, २०१२) |
|
आजकालच्या ह्या जगात अगदी अस्सल नवीन असं काही असू शकतं का? आपण नवीन जे काही करत असतो ते आपल्या आयुष्यातल्या अनुभवांच्या गोळाबेरजेतूनच होत नसतं का? ... एखादा लेखक किंवा कवी जेव्हा लिखाण करतो तेव्हा आपण खरंच नवनिर्मिती करत आहोत का हा प्रश्न नक्की भेडसावत असेल ... पण मग ह्या जगात नवनिर्मित असं काही खरंच असू शकतं का ... नवनिर्मिती म्हणजे नक्की काय हा प्रश्न अनुत्तरीत राहण्याचीच शक्यता जास्त आहे. |
|
आग्र्याहून सुटून आल्यावर महाराजांनी खऱ्या अर्थाने मराठी साम्राज्याची बांधणी करण्यास सुरुवात केली. ह्या एकसंध साम्राज्याला एकंच गालबोट होतं ते शत्रूच्या हातात असलेल्या कोंढाण्याचं. आपल्या मुलाचं लग्न 'आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं' असं म्हणत बाजूस सारून तानाजी मालुसरे त्या अभेद्य किल्ल्याला जाऊन भिडले. त्यांच्या पराक्रमाची ही गाथा वाचा माझ्या 'शिवबा' ह्या कवितेच्या आठपैकी सातव्या 'गड आला पण सिंह गेला' ह्या भागात.
शूरवीर ते उभे ठाकती
एकमेक सामोरे
शुद्ध विसरुनी अचंबित ते
युद्ध पाहती सारे
तानाजीची ढाल तुटे तो
पुरला एकच फटका
हाताला तो बांधून लढला
डोक्याचा मग पटका |
| AiQak vaacaa... |
|
AiQak vaacaa... |
|
AiQak vaacaa... |
|
| |

|
... आणि मग चाळीशी जवळ आलेल्या ह्या 'नवीन' पिढीला जेव्हा स्थैर्याची गरज भासू लागते तेव्हा त्यांचे पगार इतके वाढलेले असतात की संस्थेकरता ते फार महागडे झालेले असतात. इतर संस्थाही त्यांना एवढा पगार देऊ शकत नाहीत. अवास्तव पगारामुळे महागड्या सवयी लागलेल्या असतात. मोठी वाहनं, वाहनचालक, विमानप्रवास, परदेशी सहली, मोठमोठ्या क्लब्समध्ये सभासदत्व, महागड्या शाळा, कपडे, दागिने, घरं. मन आणि शरीर तडजोडीला तयार नसतं. स्वतःच्या अहंभावाशी तडजोड केली तरी घरच्यांच्या अपेक्षांचं ओझं उतरवता येत नाही. आणि मग सुरु होते एक जीवघेणी धडपड ... AiQak vaacaa... |
|
|
|

|
कविता करावी असं वाटतं त्याला संवेदनशील मन लागतं ... मानवी जीवनाकडे पाहण्याचं एक तत्वज्ञान संदीपच्या कवितांतून जाणवतं.
स्नेहलता देशमुख
AiQak
vaacaa... |
| |
संदीपच्या कविता आकाराने जरा मोठ्या असतात परंतु त्यातला आशय खूप काही सांगणारा असतो ... घटनात्मकता आणि चित्रात्मकता यांची छान सांगड म्हणजे संदीपच्या कविता!
वर्षा भावे
AiQak
vaacaa... |
| |
शब्द ...
इंद्रधनुष्याच्या सप्तरंगात रंगणारे शब्द ..!
शब्दांपुढे शब्द ठेऊन कविता जन्माला येत नसते ..,
तर .......
त्यात 'उत्कट भावनांचा' ओलावा असावा लागतो ...!
जो ओलावा ... मित्र संदीप दांडेकरांच्या कवितेत निश्चितच आहे.
विसुभाऊ 'कुटुंब रंगलंय काव्यात' बापट
AiQak
vaacaa... |
| |
|
|
|
|
|
| |
 |
| |
|
|
|
|